संतापजनक : राष्ट्रवादीच्या मुजोर माजी आमदाराची महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडियो क्लिप व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा- सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिप मध्ये त्यांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या आहेत. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला आहे.

“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे.

त्यामुळे पक्षाच्या महिला व इतर पदाधिकाऱ्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.