कंगनाच्या ‘थलायवी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद; आतापर्यंत केवळ ‘इतकी’ कमाई

kanagna rnaawat

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘थलायवी’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कंगनाचा थलायवी चित्रपट रिलीज येत्या 10 सप्टेंबर रोजी म्हणजे कालच थिएटरमध्ये रिलीज झाला. मात्र कंगनाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतीसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची पहिल्यादिवसाची कमाई ही फार कमी झाली आहे.

या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त 1.44 कोटींची कमाई केली. यात हिंदी व्हर्जनचा वाटा केवळ 25 लाखांचा होता. तर पहिल्या वीकेंडला या सिनेमाने केवळ 4.86 कोटींची कमी केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजनंतरच्या 3 दिवसांत 5 कोटींचा गल्ला जमवण्यात आला आहे.

‘थलायवी’च्या हिंदी व्हर्जनने तीन दिवसांत फक्त 1 कोटींचा बिझनेस केला. पहिल्या दिवशी 25 लाख, शनिवारी 30 लाख आणि रविवारी 45 लाखांची कमाई झाली. ‘बेलबॉटम’सोबत तुलना केल्यास अक्षयच्या सिनेमाने पहिल्या वीकेंडला देशभरात 15 कोटींचा बिझनेस केला होता. म्हणजे ‘बेलबॉटम’पेक्षा देखील कमी कंगनाच्या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली आहे.

महाराष्ट्रातील चित्रपटगृह अद्यापही बंद असल्याने याचा ‘थलायवी’च्या कमी कमाईला मोठा फटका बसला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ‘थलाईवी’ रिलीज होताच ऑनलाइन लीक झाला आहे. अनेकजण या चित्रपटाची अतुरतेने वाट पाहता होते. मात्र चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याने त्याचा परिणाम कमाईवर झाला असल्याचे देखील म्हंटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :