करणी सेनेच्या नाकावर टिच्चून चाहत्यांची चित्रपटगृहात गर्दी

चित्रपटाच्या तिकिटाचे दर गगणाला भिडले.

टीम महाराष्ट्र देशा: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पद्मावत’चित्रपटाचे मुंबई पुण्यासह आज राज्यभरात कडक बंदोबस्तात पद्मावत शोज सुरू आहेत. करणी सेनेच्या नाकावर टिचून प्रेक्षकांनी चित्रपट गृहात तुफान गर्दी केली आहे. पहिला शो सकाळी आठ वाजताच सुरू झाला. चित्रपटाला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवला. तरीदेखील करणी सेनेकडून चित्रपटाला देशभर विरोध करत आहे.

दरम्यान, काल दिल्लीत एका स्कूलवरच आंदोलकांनी दगडफेक केल्याने देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय. सुप्रीम कोर्टाने बंदी उठवूनही करणीसेना नेमकी कोणाच्या जीवावर कायदा हातात घेतेय. असा प्रश्न उपस्थित होत आहे. कालच्या जाळपोळीनंतर मल्टिप्लेक्स असोसिएशननं गुजरात, मध्य प्रेदश, राजस्थान, हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय. करणीसेनेच्या विरोधामुळे प्रारंभीपासूनच चर्चेत राहिल्याने प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. करणीसेनेचा विरोध झुगारून प्रेक्षक मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करताहेत. त्यामुळे सिनेमाचं पहिल्या तीन दिवसांचं बुकिंगही आत्ताच हाऊसफूल्ल झालंय. परिणामी सिनेमाचे तिकीट दर गगणाला भिडलेत.

पद्मावत तिकिटाचे दर

मुंबई

एट्रिया मॉल १०५० ते १५५० रु.

फिनिक्स मार्केट सिटी,कुर्ला – ७८० रु.

ओबेरॉय मॉल, गोरेगाव – ७३० रु.

रघुलीला मॉल, वाशी – ८०० रु.

पीवीआर, वर्सोवा – १५३० रु.

पीवीआर फिनिक्स – ९०० रु.

दिल्ली

पीवीआर एम्बिअन्स २२०० ते २४०० रु.

पुणे

आयनॉक्स, इन्सिनिया – ७३० रु.

कोलकाता

क्वेस्ट, इन्सिनिया – १०५० रु.

बंगळुरू

पीवीआर, कोरामंगला ११०० ते १२०० रु.

You might also like
Comments
Loading...