चांगल्या कामासाठी वर्दीचा लिलाव ! त्यात काहीच चुकीचं नाही- अक्षय कुमार

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याने काहीदिवसांपूर्वी ‘रुस्तम’ सिनेमात परिधान केलेल्या वर्दीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र अक्षयच्या या निर्णयाने नवीन वाद निर्माण झाला आहे. ‘चांगल्या कामासाठी वर्दीचा लिलाव करत असून त्याच चुकीचं काहीच नाही’ असं अक्षयने स्पष्ट केले आहे.

अक्षय कुमारने २०१६ मध्ये ‘रुस्तम’ चित्रपटात नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याच चित्रपटात परिधान केलेल्या वर्दीचा लिलाव करणार असल्याचं अक्षय कुमारने ट्विटरवर जाहीर केलं होतं. त्याची पत्नी ट्विंकलनेही समर्थन केलं होतं.

अक्षय कुमार म्हणाला, ‘परंतु चांगल्या कामासाठी वर्दीचा लिलाव करत असून त्याच चुकीचं काहीच नाही,’ “या मुद्द्यावर माझा पत्नीला पाठिंबा आहे. मी आणि माझी पत्नी चांगल्या हेतूने चांगलं काम करत आहोत. सिनेमात कॉश्चूम वापरला होता. चांगल्या कामासाठी त्याचा लिलाव होत आहे. आम्ही चुकीचं करतोय, असं मला वाटत नाही.” वर्दीच्या लिलावाच्या निर्णयानंतर ट्विंकल खन्नाला धमकीही मिळाली होती. “जर कोणाला ह्यात चुकीचं वाटत असेल, तर मी त्याबाबत काहीही करु शकत नाही,” असंही तो पुढे म्हणाला.

You might also like
Comments
Loading...