रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?

atul bhatkhalkar

मुंबई – देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. गुजरातमध्येही रेमडेसिवीरची मोठी मागणी आहे, दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या एका कार्यालयात हे इंजेक्शन मोफत देण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी गुजरात सरकारला घेरलं आहे. सूरतमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर रेमडेसिवीर इजेक्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर.पाटील यांनी भाजप कार्यालयातून ५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना बाधित लोकांच्या नातेवाईकांना देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं. परंतु जेव्हा ही लस स्टॉकमध्ये नाही त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजप कार्यालयातून ही कशी उपलब्ध झाली असा सवाल विरोधकांनी केला आहे.

देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे.

कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्रसरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे. हे ट्वीट करत नवाब मलिक यांनी कोरोना काळातील भाजपाचे राजकारण देशातील जनतेसमोर आणले आहे.

मलिक यांनी केलेल्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उत्तर दिले आहे. रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय? सरकार म्हणून तुम्ही तोडपाणी शिवाय काहीच करत नाही, दुसरा काही काम करतोय त्याचे तरी कौतुक करा असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP