‘जलयुक्त शिवारची चर्चा मिडीयातून गायब करण्यासाठी ठाकूर यांचा राजीनामा मागितला जात आहे’

yashomati thakrur

मुंबई- कॉंग्रेस नेत्या व उद्धव ठाकरे सरकारमधील महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना ही शिक्षा झाली आहे.

पोलीस कॉन्स्टेबलवर हात उचलणे यशोमती ठाकूर यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे.ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिर परिसरात पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२ रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तसेच अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि रुपये १५ हजार दंड आकारण्यात आला आहे.सोबतच त्यांचा कार चालक आणि दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

दरम्यान,यशोमती ठाकूर यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.पोलिसांवर हात उचलताना यशोमतीताईंवर कुठले संस्कार होते आणि तेव्हा संविधानाचे त्यांना स्मरण झाले नाही का, असा प्रश्नही शिवराय कुळकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी एक अजब दावा केला आहे. एका जुन्या केस चा निकाल लागला त्या आधारे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा राजीनामा भाजपा मागत आहे. त्यांना या देशाच्या न्यायप्रक्रीयेवरच विश्वास नाहीय. या प्रकरणात यशोमती ठाकूर यांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला आहे. बाकी जलयुक्त शिवार ची चर्चा मिडीयातून गायब करण्यासाठी भाजपा याचा राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतेय. पण राज्याची जनता सुज्ञ आहे, ती भाजपच्या अजेंड्याला बळी पडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:-