‘देशभरात केंद्रीय एजन्सींना हाताशी धरून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे’

'देशभरात केंद्रीय एजन्सींना हाताशी धरून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे'

मुंबई : मुंबईच्या समुद्रातील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खालना अटक करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्यावर पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर राजकारण तापले आहे. महाराष्ट्रात काय पोलीस पोलीस खेळ सुरु आहे काय? अशी टीका भाजप आमदार अशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार ट्विटमध्ये म्हणतात, ‘तक्रारदारावरच पोलीसांनी गुन्हे दाखल करायचे. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या. माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या पोलीस अजूनही मागावरच आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलिसांकडून पाठलाग. महाराष्ट्रात काय ‘पोलीस-पोलीस’ खेळ सुरु आहे का?’ असा टोला शेलार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

दरम्यान, शेलार यांनी केलेल्या टीकेला कॉंग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी भाष्य करत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, देशभरात केंद्रीय एजन्सींना हाताशी धरून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार राजरोसपणे सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे असले उद्योग राज्यात चालू दिले जात नाहीत. राज्यात कायद्याचे राज्य असून पोलीस आता गुन्हेगारांनाच पकडतात निष्पाप लोकांना पकडून गुन्हेगार ठरवत नाहीत. असं लोंढे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या