अतुल भोसले तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांना पाडायचंयं ; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उमटला सूर

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 85 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अद्ययावत भक्तनिवासाचे उद्घाटन झालं. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात अतुल भोसले तुम्हाला पृथ्वीराज चव्हाणांना पाडायचंयं असा सूर उमटल्याचे पाहायला मिळलं.

Loading...

याकार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाषण झालं. चंद्रकांत पाटील म्हणाले, “डॉ. अतुल भोसले यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी दिलेलं योगदान पाहता, मुख्यमंत्री राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवतील. त्यांनी सध्याची जबाबदारी सार्थ ठरवली आहेच, पण अतुल भोसले यांना कराड दक्षिणमधून निवडणूक लढवायची आहे, ते निश्चितच आमदार होतील. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव त्यांना करायचा आहे”.

या कार्यक्रमासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले हे कराडवरुन 3 हजार वारकऱ्यांना घेऊन उपस्थित होते. हे सर्व लोक कराड विधानसभा मतदारसंघातील आहेत. या लोकांना हा कार्यक्रम कसला आहे हे माहीत नाही. इतकंच नाही तर सर्व वारकरी वाटावेत म्हणूण चक्क या लोकांना पांढऱ्या टोप्या वाटण्यात आल्या. यामध्ये बहुतेक जण शेतकरी आहेत.







Loading…










Loading…

Loading...