युवराजाच्या हट्टापायी महापालिकेत ‘मराठी’चा गेम! अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

Atul bhatkhalkar and thakrey

मुंबई : सद्या शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना मुंबईमध्ये चांगलाच पेटलेला दिसत आहे. यातच कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आणखी एका मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे कंगना रनौत प्रकरणी मराठी अस्मितेचा बुरखा मिरवणाऱ्या शिवसेनेचा प्रताप समोर आला आहे.

दोन ज्येष्ठ मराठी अधिकाऱ्यांना डावलून युवासेना अध्यक्ष व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टापायी संगीता शर्मा या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्यात आल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. ” युवराजाच्या हट्टापायी महापालिकेत ‘मराठी’चा गेम…शुभांगी सावंत यांच्यासह दोन सीनियर मराठी अधिकाऱ्यांचा ज्येष्ठता क्रम डावलून संगीता शर्मा यांच्या गळ्यात महापालिका चिटणीसपदाची माळ. मराठी माणसाचा बेगडी आणि सोयीस्कर पुळका दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा चेहरा उघड…”असे ट्विट करत त्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे.

काय आहे हे प्रकरण?

मुंबई महापालिकेच्या चिटणीसपदी संगीत शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये पद ज्येष्ठतेतील दोन अधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे. गेले महिनाभर या पदावरून घोळ सुरु होता. आता, या नियुक्तीवरून भाजपने सडकून टीका केली असून पदज्येष्ठता डावलून मराठी महिला अधिकाऱ्याला उच्च पदापासून दूर ठेवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा निषेध देखील केला आहे.

महत्वाच्या बातम्या :