‘अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलंय; उद्या ते मोदींविरोधात देखील तक्रार दाखल करतील’

uddhav thackeray vs atul bhatkhalkar

मुंबई : साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पोलिस महासंचालक कार्यालयात एक बैठक गेतली. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी परप्रांतातून येणाऱ्या लोकांच्या नोेदी ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राज्यात बाहेरून कोण येतो, कोठून येतो, कोठे जातो याची नोंद ठेवा, असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

दरम्यान यावरूनच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांनी दिले आहेत. हा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ठाकरे सरकारने परप्रांतीयासंबंधी हा निर्णय घेतला, पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलेय. तर महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारचे मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री संजय राठोड, मेहबूब शेख हे परप्रांतीय आहेत? असा खोचक सवाल करणारा आरोप अतुल भातखळकर यांनी केला होता. यासोबतच, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आता शिवसेनेनं भातखळकरांवर पलटवार केला आहे. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी बाबत ट्विट करत भातखळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ‘भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी भातखळकर यांची तपासणी करावी! भातखळकर यांचे डोके ठिकाणावर नसून परराज्यातुन येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करण्याची भूमिका केंद्रशासन मांडत आहेत! उद्या ते कदाचित प्रधानसेवक नरेंद्र मोदीजींच्या विरोधात तक्रार दाखल करतील,’ असा टोला कायंदे यांनी लगावला आहे.

यासोबतच, ‘अतुल भातखळकर यांचं डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आल्या त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात काय चुकीचे बोलले मुख्यमंत्री? केंद्राच्याही अशा सूचना आहेत, अनेक राज्यांना या सूचनेचे पालन करत कर्नाटक सरकार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहेत. केंद्राच्या अनेक योजना आहेत, कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात,’ असं देखील कायंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या