दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करणार-अतुल भातखळकर

atul bhatkhalkar vs uddhav thackeray

मुंबई : भाजपा नेते अतुल भातखळकर हे आज दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. भातखळकर यांनी ‘सामना’ची एक बातमी ट्विट केली आहे. या बातमीत मुख्यमंत्र्यांनी परराज्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हणालेत की, साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दुपारी १२.३० वाजता समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जाणार आहे.

‘माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; नराधमांना वचक बसावा. परराज्यांतून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल ; कुठून येतात… कुठे जातात हे बघावेच लागेल अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना केल्याचा उल्लेख बातमीत केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ सप्टेंबर रोजी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी या सुचना केल्यात.

महत्वाच्या बातम्या