मुंबई:मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला जाहीर सभा घेणार आहेत. यावरच १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (१ मे ) सभेत दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता या शब्दात त्यावेळी अयोध्येत हजर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ‘बाबरी’ दाव्याचे पितळ उघडे पाडले. १४ मे नंतर आपण खरी पोलखोल सभा घेणार आहोत असे जाहीर करून त्यांनी विरोधकांची झोप उडवलेली आहे.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
सोमय्या ग्राऊंडवरील ठळक…२
बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता या शब्दात त्यावेळी अयोध्येत हजर असलेल्या @Dev_Fadnavis यांनी शिवसेनेच्या 'बाबरी' दाव्याचे पितळ उघडे पाडले.
१४ मे नंतर आपण खरी पोलखोल सभा घेणार आहोत असे जाहीर करून त्यांनी विरोधकांची झोप उडवलेली आहे. pic.twitter.com/u299Ub73h7— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 2, 2022
दरम्यान बाबरी ढाचा पाडला, तेव्हा मी तेथे होतो. भाजपचे नेते अयोध्येत होते. मी स्वत: त्या आधीची कारसेवाही केली. त्यामुळे बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला होता. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, याचा एकदा निकाल लावा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यांच्या भाषणात मला काहीच दम वाटला नाही”, जयंत पाटील यांची टीका
- “हिंदु-मुस्लिम ही सद्भावना कायम ठेवणाऱ्या महाराष्ट्राला…”, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
- “राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने…”, जयंत पाटलांचा गंभीर आरोप
- “…तर दुसऱ्याला भाऊ मुख्यमंत्री झाल्याचं दुःख”, राज ठाकरेंच्या भाषणानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
- “…तर जीभ आम्हालाही आहे”; राज ठाकरेंच्या भाषणानंतर इम्तियाझ जलील यांचा इशारा