‘जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात; त्यामुळे त्यांना घरचेही फार गांभीर्याने घेत नसावेत’

sharad pawar and family

मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, पुराचा फटका बसल्यानंतर सरकारकडून काय घोषणा करण्यात येणार याकडे पूरग्रस्तांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.

पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन काल पवार यांनी केलं होतं.

त्यांच्या या आवाहनाला त्यांच्या घरातूनच हरताळ फासलं जात असल्याचे समोर आले आहे. एका वृत्तपत्राने राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कराडचा दौरा करणार असल्याचे वृत्त दिले होते. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

‘जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत…’ असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला आहे. रोहित पवार हे आज कराड भागासह दरड कोसळून दुर्घटना झालेल्या भागाला देखील भेट देणार असल्याचे वृत्त देण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या