‘विश्वासघात मूलमंत्र असलेले शिवसेनेवर विश्वास असल्याचं सांगतायत; त्यांनी खंजीर चिन्ह वापरावं’

sharad pawar and uddhav thackeray

मुंबई : १० जून १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. यानंतर, काँग्रेसच्याच सोबत राहून महाराष्ट्राच्या सत्तेत अनेक वर्षे राष्ट्रवादीने सहभाग घेतला. आता तर कोणीही कल्पना न केलेली अशी आघाडी असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन केलं आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन साजरा केला गेला असून कोरोना संकटाच भान राखून मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला आहे. शरद पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना ठाकरे-मोदी भेटीनंतरच्या चर्चांना पूर्णविराम लगावत आपला शिवसेनेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेसह शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे?’ असा घणाघात भातखळकर यांनी ट्विटद्वारे केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना.

नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही,’ असं भाष्य शरद पवार यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या 

IMP