‘ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना कोर्टाच्या थपडा खाण्याची इतकी हौस आहे की काय सांगावे?’

atul bhatkhalkar

मुंबई : गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात 290 पानांची विशेष अनुमती याचिका दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या याचिकेत अनेक महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणात आपली बाजू ऐकून न घेता थेट निर्णय दिला. हा नैसर्गिक न्याय नाही, असं देशमुख यांनी याचिकेत म्हटलं होतं.

मात्र आता परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा सीबीआय चौकशीचा निर्णय अयोग्य म्हणता येणार नाही. सीबीआय चौकशीचे आदेश आल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण यापूर्वी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले तेव्हा ते पदावरच होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

तर, याआधी देखील अनेक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने झापले होते. हाच मुद्दा धरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर विखारी टीका केली आहे. ‘ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना कोर्टाच्या थपडा खाण्याची इतकी हौस आहे की काय सांगावे? थोबाड फोडून घेण्याची हौस कधी फिटणार कोण जाणे? ‘ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :