मुंबई: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या मोहन चौहानला (Mohan Chouhan) दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ३१ मे रोजी मोहन चौहानला याप्रकरणात दोषी ठरवले होते. मात्र आता लवकरच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला झालेली फाशीची शिक्षा स्वागतार्ह आहे. मात्र या शिक्षेची जलद अंमलबजावणी आता राज्य सरकारच्या इच्छा शक्तीवर अवलंबून आहे. सरकारला मर्दानगी दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. उसनं अवसान आणा पण हे कराच.”, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपीला झालेली फाशीची शिक्षा स्वागतार्ह आहे. मात्र या शिक्षेची जलद अंमलबजावणी आता राज्य सरकारच्या इच्छा शक्तीवर अवलंबून आहे.
सरकारला मर्दानगी दाखवण्याची सुवर्णसंधी आहे. उसनं अवसान आणा पण हे कराच.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 2, 2022
दरम्यान आरोपी मोहनने पिडीत महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगावर रॉडने वार केले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी दिंडोशी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “घरी बसा पण एव्हढं जमवाचं”, ‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; भातखळकरांनी म्हटले ‘कोरोनाचा ED व्हॅरियन्ट’
- SL vs AUS 2022 : लसिथ मलिंगाची श्रीलंका संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती; वाचा!
- न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा खेळाडू बॅटिंग-बॉलिंग न करता पडला संघाबाहेर; वाचा!
- गुजरात टायटन्स पहिल्याच हंगामात ‘का’ चॅम्पियन बनला; मोहम्मद शमीनं सांगितलं ‘हे’ मोठं कारण!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<