‘मुंबईत ८० टक्के टक्केवारी आणि २० टक्के नालेसफाई’, अतुल भातखळकरांचा शिवसेनेला टोला

मुंबई : महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस मुंबई मध्ये नोंदवला गेला आहे. पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबून गेली आहे. तर सांताक्रूझ, चेंबूर या ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. या ठिकाणी पावसामुळे २१ जणांचा बळी गेला आहे. तर सायन, चुनाभट्टी या परिसरात पाणी तुंबले आहे. मुंबई भागातील ड्रेनेग सिस्टिम विस्कळीत झाली आहे. त्यात मुंबई पालिकेचा १०० टक्के नालेसफाईचा दावा निव्वळ पोकळ असल्याचा आरोप भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे..

मुंबईतील पावसाची स्थिती रौद्र रूप धारण करत आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईमध्ये २७१ ठिकाणी पाणी साचू लागले आहे. यामुळे शिवसेनेचे ८०-२० टक्क्यांचे सूत्र बहुतेक आता ८० टक्के टक्केवारी २० टक्के नालेसफाई झाली असावे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा १०० टक्के नालेसफाईचा दावा निव्वळ पोकळ असल्याचा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

दरम्यान मुंबईमध्ये आतापर्यंत ३१ लोकांचा बळी गेला आहे. तर चेंबूर, विखरोळ या भागात सहा जणांना दुखापत झाली आहे. तर पावसामुळे उल्हासनगर येथे रविवारी १० वर्षीय मुलाचा ड्रेनेजमध्ये पाय घसरून मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उभे केले जात आहेत. यावरच अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे पालिकेच्या कारभारावर प्रश्न निर्माण करत शिवसेनेला धारेवर धरले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP