मुंबई: केंद्र सरकारने एलआयसीमधील हिस्सेदारी विकण्यास काढली आहे. एलआयसीमधील फक्त ५ टक्के हिश्शाची विक्री केली जाणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात सध्या खासगीकरणाची खाज वाढू लागली आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारवर टीका केली. तर यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“मोदी सरकारच्या खाजगीकरणावर टीका करण्यापूर्वी या खाजगीकरणाची सुरुवात काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंह अर्थमंत्री झाले असताना ३० वर्षांपूर्वी केली होती हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. योग्य माहितीच्या आधारे टीका करण्याची मुख्यमंत्र्यांना कधीच गरज वाटत नाही इतके ते स्वतःला स्वयंभू समजतात.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
मोदी सरकारच्या खाजगीकरणावर टीका करण्यापूर्वी या खाजगीकरणाची सुरुवात काँग्रेसचे डॉ. मनमोहन सिंह अर्थमंत्री झाले असताना ३० वर्षांपूर्वी केली होती हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये
योग्य माहितीच्या आधारे टीका करण्याची मुख्यमंत्र्यांना कधीच गरज वाटत नाही इतके ते स्वतःला स्वयंभू समजतात. pic.twitter.com/ZN0fSHb8NO— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 7, 2022
दरम्यान भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या कार्यक्रमात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, “देशात अनेक नवनवीन गोष्टी बघायला मिळत आहेत. आज जे समोर चित्र दिसतेय, ते म्हणजे खासगीकरणाची खाज वाढू लागली आहे. कुठे कुठे खाजवणार आणि काय काय खासगी करणार याची काही कल्पनाच नाही.”
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 GT vs MI : रोहितनं ठोकला डोळ्यांची पारणं फेडणारा षटकार..! रणवीर सिंहही झाला फिदा; पाहा VIDEO!
- “एका पोरामुळे मुंबईच्या पैशाचा चुराडा होतोय, याला…”, ‘त्या’ प्रकरणावरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- “…मगर रगो में भी उबाल रखता हूं”, जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत
- IND vs WI : टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा; ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक!
- IPL 2022 GT vs MI : नशिबच फुटकं..! गुजरातचा फलंदाज ‘अशा’ पद्धतीनं झाला OUT; पाहा VIDEO!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<