अतुल भातखळकरांनी कोळसा टंचाईचं खापर फोडलं उर्जामंत्री नितीन राऊतांवर

मुंबई : सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने वीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीज निर्मितीमध्ये लक्षणीय घट सुरु आहे. तर वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत देखील वाढ होत आहे.

परिणामी विजेची मागणी व उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना व सोबतच विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत अनेक टीका केल्या. त्यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उर्जामंत्री नितीन राऊतांवर या कोळसा टंचाईचं खापर फोडलं आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोळसा टंचाईची नौटंकी बंद करून त्यांच्या निष्क्रियतेमुळेच राज्यावर वीज टंचाईचे संकट ओढवले असल्याचे मान्य करावे.
खाजगी कंपन्यांकडून होणाऱ्या वीज खरेदीत महाविकास आघाडी सरकारने मोठा घपला केला आहे. यांची जिथे तिथे वसूली सुरू आहे, असं भातखळकर म्हणाले आहे.

महाराष्ट्रात लोड शेएडींग करावं लागेल याला कारण महाविकास आघाडीची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार आणि खापर केंद्रावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न हे करतात, असा आरोप भातखळकरांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या