मुंबई: राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी (२० एप्रिल) जारी केला आहे. मात्र १२ तासांच्या आतच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.
“५ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला अवघ्या १२ तासांत स्थगिती देण्याचा अलौकिक विश्वविक्रम महाविकास आघाडी सरकारने केला आहे. आदेशही आपलाच आणि स्थगिती ही आपलीच. अर्थात दोन्हीचे कारण अर्थपूर्णच आहे. हे राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?”, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत केला आहे.
५ बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला अवघ्या १२ तासांत स्थगिती देण्याचा अलौकिक विश्वविक्रम महाविकास आघाडी सरकारने केला आहे.
आदेशही आपलाच आणि स्थगिती ही आपलीच. अर्थात दोन्हीचे कारण अर्थपूर्णच आहे.
हे राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत? pic.twitter.com/jrJUeupped— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 21, 2022
दरम्यान मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. मात्र यांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. दरम्यान राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “कुणाला वाटत असेल द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल पण…”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- ST कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय?; संजय राऊतांचा सवाल
- “…आणि ‘लाल परी’ मुक्त झाली! गाढवांचे काय?”, ‘सामना’तून संजय राऊतांचा प्रहार
- “५ कोटी द्या; अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करणार”, धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
- “सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर…”, संजय राऊतांचा प्रहार