मुंबई: औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी मोठी घोषणा केली आहे. एमआयएमवर वारंवार आरोप केला जातो की, आमच्यामुळे भाजप जिंकून येते. तुम्हालाही भाजपला हरवायचे आहे आणि आमचेही उद्दिष्ट हेच आहे ,त्यामुळे आता आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे जलील यांनी म्हटले आहे, यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“महाविकास आघाडीत MIM देखील सामील होणार? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे.
भाजपला रोखण्यासाठी उद्या पाकिस्तानमधील मुस्लिम लीग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याची बातमी आली तरी आश्चर्य वाटणार नाही.”,असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीत MIM देखील सामील होणार? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे.
भाजपला रोखण्यासाठी उद्या पाकिस्तानमधील मुस्लिम लीग आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याची बातमी आली तरी आश्चर्य वाटणार नाही. pic.twitter.com/rPZfktGeB1— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 19, 2022
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक बैठक झाली असून तेव्हा आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला की, एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार आहे. आम्ही ते काय करतात ते पाहू, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. दरम्यान स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या या पक्षांनी शिवसेनेची साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात उभे राहण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला होता. त्यामुळे आता आम्हीही त्यांना प्रस्ताव दिला असून भविष्यात यांनी आमच्यावर आरोप देण्यापूर्वी विचार केला पाहिजे की, भाजपला दूर राहण्यासाठी एमआयएम कुणासोबतही जाण्यास तयार आहे. असेही जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<