‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली

atul bhatkhalkar

मुंबई : भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. काल पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून ते इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

तर, या बैठकीनंतर समाजवादी पार्टीसह इतर नेत्यांनी ही बैठक राजकीय हेतूने झाली नसून यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, कालपासूनच भाजप नेत्यांनी या बैठकीवर टीकांचा हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या बैठकीची खिल्ली उडवली असून अप्रत्यक्षरीत्या शरद पवार यांच्यावर देखील बोचरी टीका केली आहे.

”राष्ट्रीय विचार मंच’ची बैठक म्हणजे वाकलेल्या, थकलेल्या, एकाकी, आत्मकेंद्रित नेत्यांची गोधडी. यामुळे प्रसिद्धीची उब मिळण्यापलीकडे काहीच निष्पन्न होणार नाही. ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश आहे. पण, येणार तर मोदीच…,’ असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP