मुंबई: राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने (Big decision of High Court) रद्द केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याकारणाने या १२ आमदारांचे ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते. आज सुप्रीम कोर्टाने हा निर्णय रद्द केल्याचा निर्णय दिला आहे. यावरच आता निलंबित आमदारांपैकीच एक असणारे भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्याकडे बहुमत आहे या गुर्मीत भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन (suspension of 12 BJP MLA) सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत आपटले आहे. हा निर्णय म्हणजे महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे आणि कारभाराचे थोबाड फोडणारा निर्णय आहे. केवळ आणि केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून अन्यायाने, गैरपद्धतीने आम्हाला निलंबित करण्यात आले. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाविकास आघाडी सरकारचे थोबाड फोडणारा आहे. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार”, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
थोबाड फुटले…
आमच्याकडे बहुमत आहे या गुर्मीत भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले.
राज्य सरकार पुन्हा एकदा तोंडावर सणसणीत ॲपटले.
सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार 🙏🙏💐💐 pic.twitter.com/D0rSZNStRb— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 28, 2022
दरम्यान १२ आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले होते. एक वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया अशी १२ आमदारांची नवे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे- चंद्रकांत पाटील
- हायकोर्टाचा मोठा निर्णय! ‘त्या’ १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द
- “‘त्या’ क्रीडांगणासाठी जनतेच्या पैशांचा चुराडा होत आहे”, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “…हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय”, अन्सारींच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र
- भाजप आ. अमित साटम यांची महापौर पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<