मुंबई: कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) कंपनी देशात सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते. त्यांच्या अव्यवस्थापनामुळे वीज भारनियमन निर्माण झाले आहे, असे राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटले आहे. कोळशाच्या उपलब्ध परिस्थितीनुसार दररोज कोळसा दिला जातो. या स्थितीत फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
“वीज भारनियमन कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळं इति ऊर्जा मंत्री. सबंध देशात फक्त महाराष्ट्रात कोल इंडिया कंपनीमुळे कोळशाची टंचाई आहे. शेजारी राज्ये अतिरिक्त वीज बनवत आहेत. एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ‘ऊर्जा’ मंत्री महोदयांना कुठून मिळते?”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
वीज भारनियमन कोल इंडिया लिमिटेड कंपनीमुळं इति ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC.
सबंध देशात फक्त महाराष्ट्रात कोल इंडिया कंपनीमुळे कोळशाची टंचाई आहे. शेजारी राज्ये अतिरिक्त वीज बनवत आहेत.
एवढं धडधडीत खोटं बोलण्याची ऊर्जा मंत्री महोदयांना कुठून मिळते? pic.twitter.com/vs0C3pZF2o— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 16, 2022
जे वीजचोरी करतात, वीज बिल भरत नाही, अशा राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी वीज बिल प्रामाणिकपणे भरावे. त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही. सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम राज्यातील जनतेला आहे, तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहेत. तसेच दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करायला हवे. त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे. असेही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब…”, रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला
- IPL 2022 : सनरायझर्स हैदराबाद कडून विजयाची हॅट्ट्रिक! KKRचा ७ विकेट्सने पराभव
- IPL 2022 : राणा – रसेलच्या खेळीने कोलकाता सुसाट! सनरायझर्सपुढे १७६ धावांचे लक्ष्य
- IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का; दीपक चहर स्पर्धेतून बाहेर!
- गुणरत्न सदावर्ते यांना तिहेरी झटका! मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापुरातही गुन्हा दाखल