मुंबई : पुणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात असताना राज्याबाबत उद्धव ठाकरे काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. पुन्हा लॉकडाऊन होणार का ? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना भाष्य केलं आहे.
‘महाराष्ट्रात जवळपास ९ लाख कोरोना युद्ध्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. बाकी असलेल्या कोव्हीड योद्ध्यांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवता बेधडकपणे लसीकरण करून घ्यावं,’ अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर, आता सर्वसामान्यांना लस कधी मिळणार ? असा सवाल उपस्थित होत आहे. कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या, कोणत्या देशाला किती लस पुरवायच्या याबाबत केंद्र सरकारच निर्णय घेत आहे. गेल्या आठवड्यात एक बातमी समोर आली होती. दक्षिण आफ्रिकेहुन लसी पुन्हा पाठवण्यात आल्या आहेत. त्या निरुपयोगी नाहीयेत. आपल्या देशामध्ये त्यांचा उपयोग करता येईल,’ असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
याच मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते सफेद झूठ आहे. आफ्रिकेकडून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होत, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते सफेद झूठ आहे. आफ्रिकेकडून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा @OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींना ‘हम दो, हमारे दो’ म्हणण्यासाठी आधी लग्न करावं लागेल’
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं; तृप्ती देसाईंच आव्हान !
- पूजाच्या वडिलांनी ‘हे’ सांगताच आल्या पावली परत फिरल्या तृप्ती देसाई
- ‘जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही, ना मदत, ना दिलासा’