उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल

उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? भाजप नेत्याचा थेट सवाल

cm

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सकाळी ११.०० वाजता सुरू झालेली ही बैठक जवळपास तासभर सुरू होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या दौऱ्याची चांगलीच चर्चा होत असून विरोधकांनी आता मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीवरून भाजपाने पुन्हा टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये? , असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेत आहे. या भेटीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून टीका केली आहे.

भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेला एक फोटो ट्विट केला आहे. ‘आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही. कळत नाही. वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?,’ असे म्हणत भातखळकर यांनी ठाकरेंवर तोफ डागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या