महिना १०० कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर भाजपची टीका

महिना १०० कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर भाजपची टीका

मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले आहेत.

नुकताच वानखेडे यांनी पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. वानखेडे यांच्या या आरोपांमुळे विरोधकांना सरकारला टार्गेट करण्याची संधी मिळाली असून या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश पोलिसांना दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

वळसे पाटील  यांनी  दिलेल्या या स्पष्टीकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, महिना १०० कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? असे आदेश तोंडीच द्यायचे असतात हे जनतेला ठाऊक आहे वळसे पाटील साहेब? असं म्हणत खोचक टीका भातखळकर यांनी वळसे पाटील यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या