तुरुंग पर्यटन खात्यासाठी सुयोग्य मंत्री मंत्रिमंडळातच आहेत,भातखळकरांचा देशमुखांना टोला

anil deskhmukh

मुंबई : राज्यात पहिल्यांदाच जेल टुरिझम सुरू करण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची आज घोषणा केली. येत्या 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या जेल टुरिझमचं उद्घाटन करण्यात येणार असून पुण्यातील प्रसिद्ध येरवडा तुरुंगापासून हे जेल टुरिझम सुरू होणार असल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंग आहे. जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तुरुंग पर्यटन खात्यासाठी आपल्याकडे सुयोग्य मंत्री मंत्रिमंडळातच आहेत…असा टोमणा त्यांनी राज्य सरकारला मारला आहे.

महत्वाच्या बातम्या