मुंबई : प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे असे जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे आहे. बहुदा आपल्याविषयी ट्विट केल्यावर टीकाकाराला बंगल्यावर नेऊन अमानुष मारहाण करण्यामुळे राजकारणाची पातळी उंचावत असावी असे आव्हाड यांचे म्हणणे दिसते’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे असे जितेंद्र आव्हाड यांचे म्हणणे आहे.
बहुदा आपल्याविषयी ट्विट केल्यावर टीकाकाराला बंगल्यावर नेऊन अमानुष मारहाण करण्यामुळे राजकारणाची पातळी उंचावत असावी असे आव्हाड यांचे म्हणणे दिसते. pic.twitter.com/MJRK0OBOmv— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 11, 2022
दरम्यान, आव्हाड म्हणाले होते की,’मी आत्तापर्यंत अनेक मोर्चे काढले पण मी कोणाच्या घरावर गेलो नाही. कोणाच्या बायका,पोरांना त्रास होईल असं कधी वागलो नाही. पण आजकाल काहीही झालं तर माझ्या घरावर मोर्चे येतात. त्यामुळे सध्या राजकारणाची पातळी फार खालावली आहे असेच मी म्हणेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- “राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचंय”
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<