‘काँग्रेसने देशात भ्रष्टाचार संस्कृती तळागाळापर्यंत रुजवली’, अतुल भातखळकरांचा आरोप

atul bhatkhalkar

ठाणे : अनधिकृत दुकाने तोडण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज फेटाळण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाखांची लाच घेताना भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकाला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सिद्धेश्वर कामुर्ती असे अटक केलेल्या नगरसेवकाचे नाव आहे.तर यावरूनच आता भाजपने काँग्रेसवर निशाना साधला आहे.

‘भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना अनाधिकृत दुकान न तोडण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. काँग्रेसने देशात भ्रष्टाचार संस्कृती किती तळागाळापर्यंत रुजवली आहे त्याचे हे उदाहरण आहे.’ असे ट्वीट भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान नगरसेवकाच्या लाखो रुपायांच्या या लाचखोरीमुळे महापालिका आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कामुर्ती हे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आहेत. भिवंडीतील पद्मानगर भाजी मार्केट येथे तक्रारदाराचे दुकान आहे. याठिकाणी सुमारे १०० दुकाने आहेत. अनधिकृत असलेली ही दुकाने तोडण्याबाबत कामुर्ती यांनी महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी कामुर्ती यांनी प्रत्येक दुकानामागे २ लाखाप्रमाणे एकूण तब्बल दोन कोटींची लाच मागितली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या