मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सध्या तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख
(Anil Deshmukh) यांची पाठराखण करत ‘गृहमंत्र्याला कोण देतंय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’, असे म्हटले आहे. तसेच भाजप आणि केंद्र सरकारचं असं आहे ‘मुह में राम बगल मे छुरी’, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“मुंह में फुले, शाहू, आंबेडकर बगल में चावल और स्टैंप पेपर”, असा टोला भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे. तसेच ‘कोण देताय १०० कोटी?, मीही गृहमंत्री होतो’ इति छगन भुजबळ. खोटे स्टॅम्प पेपर छापून आणि रेशनचे तांदूळ ढापून कराडो रुपये मिळत असतील तर कोण कशाला पोलिसांकडून खंडणी वसूली करेल? अशी टीकाही भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान सोलापूर दौऱ्यावर गेलेले छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले की, ज्या वाझेला अटक झाली आहे तो चांदीवाल आयोगासमोर सांगतो की अनिल देशमुख मला बोलले नाहीत. मी तसं लांबून ऐकलं. याला काय अर्थ आहे? याचा अर्थ काही करून त्यांच्यावर काहीतरी आरोप ठेवायचे आणि असे मोठे १०० कोटी, ५०० कोटी, १००० कोटी असे आरोप ठेवले की मग ईडीची केस मजबूत करायची आणि जास्तीत जास्त तुरुंगात ठेवायचं हा प्रकार आहे ईडीचा. अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ईडीवरही टीका केली.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आज अजिंक्य गुजरातला पंजाब संघ भिडणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
अबब.. आयएनएस विक्रांतसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी
“वाचाळ आणि गचाळ बडबड दुसरं काही नाही”, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर राम सातपुतेंचा टोला
IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!
“महागाईमुळे सामान्य जनता हवालदिल असताना आता औषधाचे दर…”, राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा