पंढरपूर : आज मकर संक्रांत महिलांसाठी एक महत्वाचा सण या पार्श्वभूमीवर महिलांकडून वाण देण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली जाते. तर देवींच्या मंदिरात विशेषतः गर्दी पाहायला मिळते. तर यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच महिलांनी मंदिरात गर्दी केली आहे.
मंदिरांमध्ये देखील आकर्षक सजावट केली जाते. अशीच सजावट आज पंढरपूरच्या विठ्ठल -रुख्मिणी मंदिरात करण्यात आली आहे. पुण्यातील भाविक नवनाथ भिसे ह्यांच्या सौजन्याने मंदिर परिसरात फुलांची आरास करण्यात आली आहे. विठूराया आणि रुक्मिणी मातेचा गाभारा व मंदिराचे प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभाऱ्यात व मंदिरातील प्रवेद्वारावर तुळस, ;ॅस्टर, जरबेरा, झेंडू, शेवंती, कार्नेशन, ऑर्किड, बिजली, ग्लॅडीओ या फुलांपासून सजावट करण्यात आली आहे.
या शिवाय सोळखांबी, सभा मंडप आणि मंदिराच्या विविध भागात देखील सजावट आहे.
मंदिरात आज विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला दागिन्याने सजवण्यात आले आहे.
तर आज संक्रांति निमित्त रुक्मिणी मातेला महिलांनी नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी गर्दी केली आहे. मंदिर समितीने खास महिलांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था केली असून हजारो महिला भाविक आज पहाटेपासून ताटात हळद , कुंकू , तिळगुळ आणि शेतात आलेले ऊस , बोर, गाजर, हुरडा यासह सर्व प्रकारचे धान्य अर्पण करण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे फक्त पाच हजार भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- हे पण आम्हीच केले…औरंगाबादमध्ये रंगली सेना- काँगेसमध्ये श्रेयवादाची लढाई
- परिसराची स्वच्छता हाच बर्ड फ्ल्यू टाळण्याचा मंत्र
- ‘धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा,अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलने करणार’
- ज्यांचा कोरोना लसीवर विश्वास नाही त्यांनी पाकिस्तानात निघून जावे; भाजप नेत्याचा अजब सल्ला
- कोरोनाचे संकट दूर होऊ दे…सोलापूरचे वैभव पुन्हा येऊ दे; भरणे यांचे सिद्धरामेश्वरांकडे साकडे