शिक्षक, पदवीधर मतदारांनो या बाबींकडे लक्ष द्या नाहीतर तुमचं मत होऊ शकत बाद..!

votar

प्राजक्त झावरे पाटील  : महाराष्ट्रात येत्या २५ जून रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघात निवडणूका होत आहेत. यात मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकाचा समावेश होतो या मतदारसंघातून अनेक उमेदवार आपले संकल्प घेऊन रिंगणात उतरले आहेत. सगळीकडेच प्रचाराचा जोर शिगेला पोहचला आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून उमेदवार आपली भूमिका मांडत आहेत. या मतदारसंघातील मतदारांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत वाढलेली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात लाखाच्या वर तर मुंबई पदवीधर मध्ये सत्तर हजाराच्या घरात मतदार मतदान करणार आहेत. त्यामानाने मुंबई शिक्षक मतदारसंघात दहा हजाराच्या घरात तर नाशिक शिक्षक मतदारसंघात पन्नास हजाराच्या वर मतदार मतदान करणार आहेत.

या मतदारसंघातील मतदान हे पसंती क्रमांकाचे म्हणजे आपल्या नेहमीच्या मतदान प्रक्रियेप्रमाणे नसल्याने मत बाद होण्याची शक्यता असते.  त्याकरिता मतदानापूर्वी मतदारांनी खालील बाबी लक्षात ठेवून मतदान करावे

Loading...

१. आपल्याला मतदान केंद्रात दिल्या जाणाऱ्या बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहायचे असून ते लिहण्याकरिता बॅलेट पेपर सोबत दिलेला स्केचपेनच वापरावा. दुसरा आपल्या सोबतची कोणताही पेन, पेन्सिल वापरू नये.

२. ज्या उमेदवाराला तुम्हाला पहिल्या पसंतीचे मतदान करायचे आहे त्याच्या नावासमोरील पसंती क्रमांक लिहायच्या चौकटीत ‘1 ‘असे लिहावे. तुम्हाला ‘ 1’ हा पसंती क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. पुढील पसंती क्रमांक नोंदवणे तुम्हाला ऐच्छिक आहे.

३. तुम्ही जेवढे उमेदवार असतील तेवढे पसंती क्रमांक त्यांच्या पुढील चौकटीत लिहून मत नोंदवू शकता. जसे 2,3,4

(तुमच्या पसंतीनुसार)

४. एका उमेदवारासमोर एकच पसंती क्रमांक नोंदवता येईल , तसेच तोच पसंती क्रमांक दुसऱ्या उमेदवारासमोर नोंदवता येणार नाही.

५. पसंती क्रमांक नोंदवताना 1,2,3,4.इ. असे अंकच नोंदवावे लागतील one, two, three…इ. किंवा एक, दोन, तीन, इ. असे शब्दात नोंदवता येणार नाहीत.

६. पसंती क्रमांक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात किंवा संविधानाच्या ८ व्या परिशिष्टतील भारतीय भाषेतील अंकात किंवा रोमन अंकात देखील नोंदवता येतील.

६. बॅलेट पेपर वर आपले नाव ,सही असे काहीही करू नये.

७. मतदानाला जाताना अधिकृत ओळखपत्र जसे मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवायचा परवाना इ. सोबत घेऊन जावे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार