भाजपकडून दलित चळवळीला बदनाम करण्याचा घाट – अशोक चव्हाण

ashok chawan

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा माओवाद्यांशी संबंध जोडून संपूर्ण दलित चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ते मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतं होते.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना धमकीचे पत्र आले आहे. पंतप्रधानांना माओवाद्यांपासून धोका आहे अशा बातम्या येत आहेत. पत्रे दाखवली जात आहेत. भाजप प्रवक्ते याबाबत पत्रकारपरिषदा घेत आहेत. पण सरकारकडून मात्र याबाबत अधिकृतपणे कोणीही बोलत नाही. पुणे पोलीस अधिकृतपणे काही बोलत नाहीत.

भाजपकडून या गंभीर विषयाचे केवळ राजकारण करण्यात येत आहे. देशातील व राज्यातील इतर मूलभूत प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठीच हा घाट घातला जातं असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.