शहरात चौघांचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणाऱ्या चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्राशन केलेल्या चौघांनाही उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीड बायपास रस्त्यावरील रेणूकामाता कमानीजवळ राहणाऱ्या अनिल संतोष कांबळे (वय २७) या तरूणाने मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहते घरी विष प्राशन केले. अनिल कांबळे याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आस्मा सलमान पठाण (वय ३०,रा.बेगमपुरा) आणि ममता इंदाल राजपूत (वय १७, रा.हिमायतबाग) या दोघींनी देखील मंगळवारी दुपारी विष प्राशन केले होते. दोघींना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच सिडको परिसरातील आझाद चौकात राहणाऱ्या हकीम मेहबूब शेख (वय ३०) या तरूणाने ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहते घरी विष प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर हकीम शेख याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-यांची नोंद संबंधीत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या