रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न

जालना : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना जालना शहरातील नाव्हा रोडवरील दत्त मंदिराच्या पार्किंगमध्ये घडली. व्यापारी राजेश भगवानदास सोनी हे मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी विना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी परिसरातील लोक जमा झाल्याने आरोपींनी तेथून पळ काढला.

दरम्यान,व्यापारी राजेश सोनी हे दत्त मंदिराजवळ पार्किंगमध्ये एकटेच असताना कारमधून आलेल्या दोघांनी त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून गाडीत बसण्यास सांगितले.  तेवढ्यात संशय आल्याने परिसरातील नागरिक तेथे जमा झाले. त्यामुळे दोन्ही आरोपी घाबरून पळून गेले.

या प्रकरणी जालना पोलिस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, त्यात आरोपी स्पष्ट दिसत नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय बगाड हे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या