भावी पोलीसांची ‘मुन्नाभाई स्टाईल’ने कॉपी करण्याचा प्रयत्न; औरंगाबादेत एकच खळबळ!

maharashtra police

औरंगाबाद : पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार ब्लूटूथच्या आधारे परीक्षेतील प्रश्न सोडविताना आढळून आला. तर एका महिला उमेदवाराचा पेपर देण्यासाठी एका अल्पवयीन मुलीस पाठविल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली.

राज्यात सध्या मेघा पोलीस भरती सुरू आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात देत आहे. या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी चालकपदासाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून सकाळपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा तगडा बंदोबस्त भेदून एका उमेदवाराने थेट मोबाईलवर कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर एका महिला उमेदवाराने आपल्याजागी अल्पवयीन मुलीस परीक्षा देण्यासाठी पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राहुल मदन राठोड (२३, रा. पारंडी तांडा, ता. पैठण) हा पोलिसांची नजर चुकवत टी-शर्टच्या चोरखिशात मोबाईल व ब्लू पर्यवेक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने राठोडची झाडाझडती घेतली असता त्यात मोबाईल, ब्लू टूथ डिव्हाईस आढळून आले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या एका घटनेत एमआयटी महाविद्यालयात पूजा दिवेकर या महिला उमेदवाराच्या जागी एक अल्पवयीन मुलगी परीक्षा देण्यासाठी आली होती. पोलिसांनी तिला तात्काळ ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने तिचे खरे नाव सांगितल्याने हा प्रकार समोर आला.

महत्त्वाच्या बातम्या