fbpx

दरोड्याच्या तयारीतील तिघे अटक तर दोन फरार

studant crime

टीम महाराष्ट्र देशा – वडगाव बाजारपेठेत दरोडा घालण्यासाठी आलेल्या तिघांना वडगाव पोलिसांनी अटक केले तर यातील दोन चोर फरार झाले. प्रशांत उर्फ अंशु प्रदीप पाठक (वय 21 रााडी, चिखली), संजय अज्युदय शर्मा (वय 21 रा देवीनगर, आकुर्डी), विशाल गायकवाड (वय 22 रा. शिरगाव) अशी अटक आरोपीची नावे असून अविनाश पांढरकर व विकी (पूर्ण नाव माहिती नाही) दोन आरोपी मात्र घटनास्तरावरून फरार झालेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे पंचमुखी मारुती मंदिराजवळील पाच जण दरोडा टाकण्याबाबत कुजबूज करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई, मनोज कदम, शशिकांत लोंढे सुरेश शिंदे यांनी पाठलाग करून शिवाजी चौकात फर्निचरच्या दुकानामागे लपलेल्या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान पांढरकर, गायकवाड व विकी हे तिघेजण दुचाकीवरून पळून गेले मात्र, त्यातील एकाच शनिवारी दुपारी वडगाव पोलिसांनी अटक केले. पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत