राज्यातील हिंदु लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री

सोलापूर : राज्यातील हिंदु लिंगायताना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यातील अडचण दूर करण्यासाठी याबाबतचा विषय ओबीसी आयोगाकडे पाठविण्यात येईल. लिंगायत समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा दिलीच आहे. या स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे.

सोलापूर जिल्ह्यातील होटगी मठाच्या वतीने वीरतपसवी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १००८ शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.