पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई सायबर विभागाचा ईमेल हॅकसाठी प्रयत्न

ईमेल हॅक

मुंबई : पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबईतील सायबर पोलिसांचे ईमेल हॅक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सायबरच्या ईमेल आयडीवर एक पीडीएफ फाईल अटॅच करुन मेल पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या यापूर्वीच्या सायबर विभागातील मेलहून हा मेल आल्याचे भासवण्यात आले आहे. हा मेल उघडल्यास ईमेल हॅक होऊन सर्व डाटा चोरी होण्याची शक्यता आहे. सायबर विभागाचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

असा ईमेल एखाद्या व्यक्तीच्या नावाने पाठवण्यात येतो. पण प्रत्यक्षात हा ईमेल त्या व्यक्तीने पाठविलेला नसतो. असे सायबर पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानी हॅकर्सने मुंबईच्या सायबर पोलिसांचे ईमेल हॅक करण्यासाठी प्रयत्न केल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. ईमेल हॅक करुन डाटा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आलेल्या फिशींग ईमेलमध्ये एक पीडीएफ फाईल अटॅच करण्यात आली आहे. ही फाईल डाऊनलोड केल्यास सायबर विभागाचा कम्प्यूटरमधील सर्व डाटा या हॅकर्सकडे जाण्याची भीती आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळजी घ्यावी असे अवाहनही सायबर पोलिसांनी केले आहे.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. असे ईमेल आल्यास उघडला जाऊ नये, असा ईमेल अल्यास सायबर विभागाची मदत घेण्याचेही अवाहन सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या