fbpx

हल्लाबोल करणाऱ्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली: पंकजा मुंडे

pankaja and ajit pawar

बीड : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे हल्लाबोल आंदोलन चांगले जोमात चालू आहे. मात्र राष्ट्रवादीचे आंदोलन पाहून विरोधक आतापर्यंत गप्प कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. आज बीड मध्ये बोलत असतांना पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्यराचा पवित्रा घेतला. अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या टीकेला उत्तर देताना. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जनतेची लूट करणारेच आता हल्लाबोल आंदोलन करत आहेत असा पलटवार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू होणार का? असा प्रश उपस्थित होतो.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

कायमस्वरूपी सत्तेच्या खुर्च्या जनतेला लुटण्यासाठी उबवल्या, यांनी कोणतेही एक क्षेत्र लुटण्याचे सोडले नाही, ज्यांनी लूट केली तेच हल्लाबोल करत आहेत. ‘मी बीड जिल्ह्यातील सर्व भागासाठी सारखा निधी दिला. बीड जिल्ह्यात विकास कामे गुणवत्त ने राबवली जात आहेत. पालकमंत्री म्हणून आपण यशस्वीपणे कामे करत आहोत. मला आश्यर्य याचे वाटते की हल्लाबोल करणारे खोटं बोलत आहेत. हल्लाबोल करणाऱ्यांनी जनतेला लुटले. संस्थेच्या जागा हडपल्या. सत्तेत होते तेव्हा घोटाळे केले आणि जनतेच्या तोंडाला पाने पुसली. लोकांच्या कल्याणासाठीच्या योजना गिळल्या आणि आता तेच लोक हल्लाबोल आंदोलनात जनतेची दिशाभूल करत आहेत. मी हल्लाबोल केला तर खरे बोलेल.