पुणे : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज शिंदे गटाते नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात होते. यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आज पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे प्रमुख आदीच्या ठाकरे यांनी एकमेकांवर नाव न घेता परस्परांवर टीका केली. तानाजी सावंत यांनी थेट कोण आदित्य ठाकरे? असा प्रश्न केल्याने या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटावर नाराज-
महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार पडल्यानंतर आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही शिंदे गटावर नाराज आहेत. पुण्यातील शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडल्याने शिंदे गटाच्या आमदारांवर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या :
- Partha Chatterjee SSC scam | पार्थ चॅटर्जीवर एका महिलेने फेकली चप्पल; म्हणाली, भ्रष्टाचारी माणसाला एसी गाडीतून का आणता?
- Sanjay Raut | संजय राऊतांना अटक झाल्याच्या आनंदात बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने वाटले पेढे
- Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग
- Shahajibapu Patil | पुरंदरमध्ये शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादी विरोधात तुफान बॅटिंग
- Eknath Shinde । राऊतांच्या घरातील ‘त्या’ पैशांशी शिंदेंचा संबंध?, मुख्यमंत्र्यांचं थेट स्पष्टीकरण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<