जळगाव : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse-Khewalkar))यांच्या वाहनावर काल (२७ डिसेंबर) अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि चालक होता. दरम्यान रोहिणी खडसे या सुखरूप असून राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या @Rohini_khadse यांच्या गाडीवर काही लोकांनी भ्याड हल्ला केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ताईंच्या मागे खंबीरपणे उभा आहे. अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देण्यात येईल! pic.twitter.com/4EewninBrx
— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) December 27, 2021
‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर काही लोकांनी भ्याड हल्ला केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ताईंच्या मागे खंबीरपणे उभा आहे. अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जशास तसे उत्तर देण्यात येईल!’ असा गंभीर इशारा मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांनी ट्वीट करत दिला आहे. दरम्यान रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत. तसेच ते एकूण पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरु आहे. त्या वादातूनच हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग; 174 संपकऱ्यांना केलं बडतर्फ
- राज्यात लावलेल्या नव्या निर्बंधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार