Japan Ex-PM Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला; प्रकृती गंभीर

नवी दिल्ली:  जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते खाली स्टेजवर कोसळले. जपान टाइम्सच्या एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान अचानक झालेल्या या घटनेने काही काळ प्रचंड गोंधळ उडाला.  या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.  शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतरचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

शिंजो आबे यांनी २८ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. शिंजो आबे हे दीर्घ काळासाठी जपानचे पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. त्यांच्यावर अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या: