Share

Arvind Kejriwal | गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

गुजरात : गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आली आहे. राजकोटच्या खोडलधाम गरबा कार्यक्रमात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही हजेरी लावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी नील सिटी क्लबच्या दांडिया कार्यक्रमात गरब्यातही सहभाग घेतला.

नील सिटी क्लबच्या गरब्यादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आली, मात्र हे कृत्य कोणी आणि का केले हे कळू शकले नाही. अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी आरोप केला की गुजरातमधील भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचारात गुंतलेल्यांनी आपले पैसे ‘स्विस बँकेत’ ठेवले आहेत, ते पैसे आम आदमी पार्टी (आप) सत्तेवर आल्यावर परत आणेल असे आश्वासन केजरीवाल यांनी यावेळी दिले.  AAP राष्ट्रीय संयोजकाने सर्वांसाठी “विनामूल्य आणि अमर्यादित” आरोग्य सेवा देणार असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर देखील निशाणा साधला आहे. काहीही झाले तरी ‘आप’चे सरकार येऊ नये, यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या गुप्त बैठका सुरू असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ‘आप’चे सरकार आल्यावर लूट थांबेल आणि सर्व पैसा शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी जाईल, असा चिमटा देखील त्यांनी यावेळी काढला आहे.

दरम्यान, डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आम आदमी पार्टी मोठ्या बहुमताने निवडणुका जिंकून राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तुमचे अच्छे दिन आले की नाही हे मला माहीत नाही, पण डिसेंबर नंतर केजरीवालजींचे खरे दिवस येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

 

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हण्यामागील कारण , म्हणाले…

Ashish Shelar | “संसार तिघांचा, पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले…”; आशिष शेलारांची बोचरी टीका

Car Update | फेस्टिव्ह सीजनमध्ये ‘या’ कार ग्राहकांना करत आहेत विशेष आकर्षित

Sandipan Bhumre । चंद्रकांत खैरेंनी हिमालयात जाण्याची तयारी करावी – संदीपान भुमरे

Shivsena | शिवसेनेला पुन्हा पडणार मोठं खिंडार?, ‘इतके’ आमदार अन् खासदार शिंदे गटाच्या संपर्कात

 

गुजरात : गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आली आहे. राजकोटच्या खोडलधाम गरबा कार्यक्रमात ही …

पुढे वाचा

India Politics

Join WhatsApp

Join Now