fbpx

मराठा आरक्षणा विरोधात याचिका करणाऱ्या ॲड. सदावर्ते यांना कोर्ट परिसरात चोपले

मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज मुंबई उच्च न्यायालय आवारात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव वैजिनाथ पाटील असून त्याने यावेळी एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी देखील केली.

राज्य सरकारकडून मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर कोर्टात काय घडलं याची माहिती सदावर्ते हे प्रसार माध्यमांना देत होते, त्याचवेळी मूळचा जालना जिल्ह्यातील असलेल्या वैजिनाथ पाटील या मराठा युवकाने हल्ला करत सदावर्ते यांना मारहाण केली.

मुंबईत शिवसेना आमदारावर प्राणघातक हल्ला