fbpx

आधार कार्ड हे पॅन कार्डला वेळीच संलग्न करून घ्या अन्यथा होणार रद्द

टीम महाराष्ट्र देशा : आधार कार्ड हे पॅन कार्डला संलग्न करून घ्यावे असा फतवा केंद्र सरकारांकडून काढण्यात आला होता. या सलंग्न प्रक्रियेसाठी सरकारने ३१ मार्च पर्यंतची मुदत दिली आहे. जर या मुदतीच्या आत आधार कार्ड हे पॅन कार्डशी संलग्न केले नाही तर ते पॅनकार्ड रद्द होणार आहे. त्यामुळे जवळपास १९ कोटीहून अधिक पॅनकार्ड रद्द होणार असल्याचे समजते.

देशभरातआयकर विभागाने ४२ कोटी जनतेला पॅनकार्ड दिले असून त्यातले २० कोटी पॅनकार्ड आधारला संलग्न करण्यात आले आहेत.तर इतर १० कोटीहून अधिक पॅनकार्ड अद्याप आधार शी सलंग्न झालेले नाहीत. जर ३१ मार्च पर्यंत हे उरलेले पॅन कार्ड सलंग्न केले नाहीत तर त्यांचे पॅनकार्ड रद्द होणार आहेत अशी माहिती सीबीडीटीचे (केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड) अध्यक्ष सुशील चंदा यांनी एका वृत्त वाहिनीला दिली.

त्यामुळे आपले पॅन कार्ड हे आधार कार्डशी संलग्न केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तत्काळी आधार कार्डला पॅन कार्ड संलग्न करा.