साध्वी प्रज्ञासिंहचा आरोप चुकीचा, एटीएसने कधी छळ केलाच नाही

टीम महाराष्ट्र देशा: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक असताना दिवंगत एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या सांगण्यावरून तुरुंगामध्ये छळ केला जात होता, असा आरोप भाजपच्या भोपाल लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने केला आहे, मात्र प्रज्ञासिंह ठाकूरकडून  करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं मानवी हक्क आयोगाने स्पष्ट केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शुक्रवारी  शहीद करकरे यांच्यावर गंभीर आरोप करत बेताल वक्तव्य देखील केले आहे. मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता, आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे विधान साध्वी यांनी केले आहे. दरम्यान, ठाकूर यांच्या वक्तव्याने विरोधी पक्षासह सामन्य नागरिक देखील आक्रमक झाले आहेत. भाजपने साध्वी प्रज्ञासिंहची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा आरोप

Loading...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोप सिद्ध करण्यासाठी हेमंत करकरे यांनी 9 वर्ष मानसिक आणि शारीरिक छळ केला. असा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे.

मानवी हक्क आयोगाचा रिपोर्ट
साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून केले जाणाऱ्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आर.एस खैरे यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क आयोग समितीची स्थापना करण्यात आली होती, खैरे यांच्या समितीने 2015 साली साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेले आरोप सिद्ध होत नाहीत, असे सांगितले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही साध्वीचे आरोप फेटाळून लावले होते.