Khultabad- खुलताबादमध्ये सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

akola rape case child

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे एका सात वर्षीय बालिकेवर अत्याचार  झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चीड आणणारी बाब म्हणजे मुलीवर अत्याचार झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यास गेलेल्या पिडीतेच्या कुटुंबियांची तक्रार नोंद करण्यात आली नाही. तर उलट पोलिसांनी पिडीतेला आणि तिच्या आईलाच खोलीत बंद केल्याचा चीड आणणारा  प्रकार घडला आहे. पिडीतेचे वडील आणि आजोबांना देखील पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनाकडून करण्यात येत आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी हि रोजच्याप्रमाणे आपल्या भावंडासोबत घराजवळच असणाऱ्या शाळेच्या मैदानावर खेळण्यासाठी गेलेली होती. त्यावेळी सायकलवरून आलेला एक मुलगा मुलीला उचलून घेवून गेला . अचानक हा सर्व प्रकार घडल्याने पिडीतेच्या  सोबत असणाऱ्या भावंडानी घरी जाऊन सर्व घटना मुलीच्या आईला सांगितली. आईने आपल्या मुलीचा शोध घेतला असता मुलगी एका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.  ज्या मुलाने हा अत्याचार केला होता तो  त्या ठिकाणावरून सायकल वरून पळून जात होता. त्यावेळी पिडीत मुलीला घेवून आईने मुलाचा पाठलाग केला . मात्र , मुलाला पकडले असता त्याने आई आणि पिडीतेला मारून टाकण्याची धमकी दिली.

पिडीतेची आई कुटुंबियांना घेवून या घटनेची पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेले होती, त्यावेळी   पोलिसांनी आरोपीला पकडले. मात्र पोलिसांनी आरोपीवर कोणतीही कारवाई  केली नाही . अत्याचार पिडीत मुलीचे कुटुंबीय पोलिसांकडे मुलीच्या मेडिकलची मागणी करत होते . त्यावेळी पोलिसांची टाळाटाळ तर केलीच मात्र पिडीतेचे वडील आणि आजोबांना मारहाण केली. तसेच पिडीत चिमुकली आणि तिच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आल होत.

तांत्रिक कारणामुळे गुन्हा नोंद करण्यास उशीर

दरम्यान हि सर्व घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र देशाने खुलताबाद पोलिस स्टेशनशी संपर्क केला असता. तांत्रिक कारणामुळे सदरील गुन्हा नोंद करण्यास वेळ लागल्याच पोलिसांकडून सांगण्यात आल आहे . तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे .