२ हजाराची नोट देशातल्या कुठल्याही ATM मध्ये मिळणार नाही

नवी दिल्ली : १ मार्चपासून एटीएममध्ये यापुढे दोन हजारांच्या नोटा मिळणार नाही, इंडियन बँकपाठोपाठ आता सर्वच बँकांच्या एटीएममधून दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहे. त्याऐवजी 100 रुपये, 200 रुपये 500 रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ATM मशीन मध्ये चार ट्रे असतात. त्यातल्या तिघांमध्ये ५०० आणि एकात १०० किंवा २०० रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बिझनेस स्टँण्डर्डने दिलेल्या वृत्तानुसार ATM मशीनमध्ये बदलाची प्रक्रिया पुढच्या काही महिन्यात पूर्ण होईल. काही दिवसांपूर्वीच इंडियन या सरकारी बँकेने देशभरातील आपल्या ३ हजार एटीएम मशीन्समध्ये दोन हजाराची नोट भरण्याची प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश दिले होते.

Loading...

एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्यावर त्याचे सुटे करण्यासाठी ग्राहकांना खूप वणवण करावी लागते. अनेकदा ते बँकेत सुटे घेण्यासाठी येतात. त्यात फार वेळही जातो. त्यामुळे आम्ही दोन हजार रुपयांच्या नोटा आमच्या एटीएममध्ये ठेवणार नाही, असे इंडियन बँकेने जाहीर केले होते.आता देशभरातील सुमारे २ लाख ४0 हजार एटीएममध्येही दोन हजार रुपयांच्या नोटा नसतील.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश